सुनेनं तक्रार दाखल करताच सासऱ्याचा ८० फूट उंच झाडावर चढून ठिय्या

सागर – कौटुंबिक वाद घरोघरी असतात. अनेक ठिकाणी सासू-सून यांच्यातून विस्तवही जात नाही. तर काही घरांमध्ये पती-पत्नी यांच्यातच भांडण असतं. मात्र आता सून आणि सासऱ्यांतील वाद चव्हाट्यावर आला आहे. सुनेनं सासऱ्याविरुद्ध गुन्हा केल्याने संतप्त सासरा चक्क ८० फूट उंचीच्या झाडावर चढून बसला होता.

सुनेनं सासऱ्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर शनिवारी सुनावणी होणार होती. मात्र त्याआधीच सासरा गावातील पिंपळाच्या झाडावर ८० फूट उंचीवर जाऊन बसला. सासऱ्याला खाली आणण्यासाठी गावकऱ्यांना आणि प्रशासनाला तब्बल १० तास अथक प्रयत्न करावे लागले. मालथौन पोलिस स्टेशन परिसरातील हिन्नोद गावातील ही घटना आहे. संबंधीत सासऱ्याविरुद्ध सुनेन मारहाणीची तक्रार दिली होती.

दरम्यान याप्रकरणी शनिवारी न्यायालयात चलन दाखल करण्यात येणार होतं. पण तत्पूर्वी सासरा मोठ्या सूनेची समजूत घालण्यासाठी गावातील एका मोठ्या पिंपळाच्या झाडावर चढला. ही घटना शनिवारी संध्याकाळी चारच्या सुमारास घडली. सहा महिन्यांपूर्वी शेतकरी उत्तमचं आपल्या मोठ्या सूनेसोबत भांडण झालं होतं, असं गावचे सरपंच पंचमसिंह यांनी सांगितलं. त्यामुळे सुनेनं तक्रार दिली होती. ही तक्रार मागे घेण्यासाठी सासऱ्याने झाडावर चढण्याची करामत केल्याचे समजते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.