Varun-Natasha Wedding : वरूण-नताशाचं लग्न अन् सोशल मीडियावर ‘मिम्स’चा धुमाकूळ

Varun-Natasha Wedding – आज बाॅलिवूड अभिनेता वरूण धवन (Varun Dhawan) आणि नताशा दलाल (Natasha Dalal) विवाह बंधनात अडकणार आहेत. मीमर हे कोणालाच सोडत नाहीत, मग या प्रसिद्ध जोडीला तरी कसे सोडतील. मीमरनी या दोघांचे मीम्स बनवून सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय.

या लग्न सोहळ्यात बाॅलिवूड जगतातील अनेक दिग्गज सहभागी झाले आहेत, अनेकजण अजूनही सहभागी होण्यासाठी येत आहेत. बाॅलिवूडमधील वरूणचे मित्र करण जोहर, मनीष मल्होत्रा, सारा अली खान, अर्जुन कपूर, मलाइका अरोरा, जान्हवी कपूर, खुशी कपूर, कतरिना कैफ, नीतू कपूर, कियारा अडवाणी, अनिल कपूर, रिया करूप, हर्षवर्धन कपूर यांसह अनेकांची उपस्थिती असणार आहेत.

वरूण धवण हा बाॅलिवूड अभिनेता आहे तर नताशा दलाल ही एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. नताशाने आतापर्यंत अनेक बाॅलिवूडमधील सेलेब्रिटींसाठी ड्रेस डिझाईन केलेले आहेत. वरूण धवन आणि नताशा हे लहाणपणापासूनचे मित्रही आहेत.

नताशाचं फॅशन डिझाईनिंगचं शिक्षण न्यूयाॅर्कमध्ये झालेले आहे. सध्या ती आपल्या आई-वडिलांसोबत मुंबईत राहते. दरम्यान, मीमर लोकांनी मजेदार मीम बनवून त्यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्यात.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.