Live Cricket Score, RCB vs KKR, Indian Premier League 2024 : आज आयपीएल 2024 चा 10 वा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात खेळला गेला. आयपीएल 2024 च्या 10 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 7 गडी राखून पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीच्या नाबाद 83 धावांच्या खेळीमुळे आरसीबीने 20 षटकांत 182 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात केकेआरने 16.5 षटकांत 3 गडी गमावून 186 धावा करत लक्ष्याचा सहज पाठलाग केला.
केकेआरसाठी फिल सॉल्टने 20 चेंडूत 30 धावा, सुनील नरेनने 22 चेंडूत 47 धावा, व्यंकटेश अय्यरने 30 चेंडूत 50 धावा आणि श्रेयस अय्यरने 24 चेंडूत नाबाद 39 धावा केल्या.आरसीबीकडून विजयकुमार, मयंक डागर आणि यश दयाल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
Another two points, secured! 🫡 pic.twitter.com/LwDcQu3Vxp
— KolkataKnightRiders (@KKRiders) March 29, 2024
183 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना फिल सॉल्ट आणि सुनील नरेन यांनी कोलकाताला दमदार सुरुवात करून दिली. आरसीबीच्या गोलंदाजांवर निशाणा साधत दोघांनी पहिल्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी केली. सातव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मयंक डागरने ही भागीदारी मोडली. नरेन 22 चेंडूत 47 धावा करून बाद झाला. त्याने 213.63 च्या स्ट्राईक रेटने दोन चौकार आणि पाच षटकार मारले. त्याचवेळी फिलिप सॉल्टने दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 30 धावा काढल्या.
या सामन्यात व्यंकटेश अय्यर आणि श्रेयस अय्यर यांच्यात चांगली भागीदारी झाली. संघाला तिसरा धक्का व्यंकटेशच्या रूपाने बसला. 29 चेंडूत अर्धशतक झळकावून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. 16व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर यश दयालने या फलंदाजाला आपला बळी बनवले. त्याने कर्णधारासोबत 75 धावांची भागीदारी केली.
रिंकू सिंग पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि पाच धावा करून नाबाद राहिला. तर श्रेयस अय्यरने षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला. त्याने आरसीबीविरुद्ध 24 चेंडूंचा सामना केला आणि 162.50 च्या स्ट्राइक रेटने 39 धावा केल्या. या काळात तो नाबाद राहिला.
तत्पूर्वी, केकेआरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 20 षटकांत 6 गडी गमावून 182 धावा केल्या. आरसीबीसाठी किंग कोहलीने 59 चेंडूत 83 धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या बॅटमधून 4 चौकार आणि 4 षटकार आले. दिनेश कार्तिकही शेवटी चमकला. कार्तिकने अवघ्या 8 चेंडूत तीन षटकारांच्या मदतीने 20 धावा केल्या. केकेआरचा मिचेल स्टार्क पुन्हा एकदा चांगलाच महागडा ठरला. स्टार्कने चार षटकात एकही विकेट न घेता 47 धावा दिल्या.
रिंकू सिंग पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि पाच धावा करून नाबाद राहिला. तर श्रेयस अय्यरने षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला. त्याने आरसीबीविरुद्ध 24 चेंडूंचा सामना केला आणि 162.50 च्या स्ट्राइक रेटने 39 धावा केल्या. या काळात तो नाबाद राहिला.
Innings Break‼️
A Virat Kohli masterclass propels #RCB to 182/6 🙌
Will #KKR chase it down? 🤔
Match Updates ▶️ https://t.co/CJLmcs7aNa #TATAIPL | #RCBvKKR pic.twitter.com/J0a7geIo52
— IndianPremierLeague (@IPL) March 29, 2024
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेल्या आरसीबीची सुरुवात खराब झाली कारण दुसऱ्याच षटकात त्यांनी कर्णधार फाफ डू प्लेसिसची पहिली विकेट गमावली. डू प्लेसिस 1 षटकाराच्या मदतीने केवळ 08 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी कोहली आणि कॅमेरून ग्रीन यांनी 65 धावांची (42 चेंडू) भागीदारी केली, ज्याच्या मदतीने संघाने 80 धावांचा टप्पा ओलांडला. 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 33 धावा (21 चेंडू) केल्यानंतर 9व्या षटकात पॅव्हेलियनमध्ये परतलेल्या ग्रीनच्या रूपाने संघाने दुसरी विकेट गमावली.
त्यानंतर कोहलीने मॅक्सवेलसह तिसऱ्या विकेटसाठी 42 धावांची (31 चेंडू) भागीदारी केली. ही भागीदारी 15 व्या षटकात संपुष्टात आली जेव्हा सुनील नरेनने मॅक्सवेलला आपला शिकार बनवले. मॅक्सवेलने 19 चेंडूंत 3 चौकार आणि 1 षटकारासह 28 धावा केल्या. यानंतर 17व्या षटकात रजत पाटीदार (03) स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर 18व्या षटकात हर्षित राणाने अनुज रावतला (03) स्लोअर चेंडूवर पायचीत केले. 151 धावांवर आरसीबीने पाचवी विकेट गमावली. यानंतर कोहली आणि दिनेश कार्तिक यांनी सहाव्या विकेटसाठी 31 (15 चेंडू) धावांची भागीदारी केली. कार्तिकने 8 षटकात 3 षटकारांच्या मदतीने 20 धावा केल्या. कोहलीने 59 चेंडूत 83 धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या बॅटमधून 4 चौकार आणि 4 षटकार आले.
हर्षित राणा आणि आंद्रे रसेल यांनी सर्वाधिक 2-2 विकेट घेतल्या. यादरम्यान हर्षितने 4 षटकात 39 धावा दिल्या. याशिवाय किफायतशीर असलेल्या रसेलने 4 षटकांत 29 धावा दिल्या. एक यश सुनील नरेनने 4 षटकात 40 धावा देत मिळवले. आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू मिचेल स्टार्कला चांगलाच फटका बसला. स्टार्कने 4 षटकात 47 धावा दिल्या.