म्हसवड -लिंगायत धर्म हा समतेची आणि समानतेची शिकवण देणारा लिंगायत धर्म आहे. या धर्मातील तत्त्वज्ञान हे सध्याच्या युगामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण असून नैतिक मूल्यांची जपण करणे हे लिंगायत धर्मातील मूळ तत्व आहे. या धर्मामध्ये स्त्रियांना समानतेचा हक्क देण्यात आला आहे. त्यामुळे सामाजिक समता बंधुता आणि सामाजिक ऐक्य यांची शिकवण देणारा लिंगायत धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे, असे विचार श्री श्री 108 शिवाचार्य रूद्र पशुपती कोळेकर महाराज यांनी मांडले.
म्हसवड (ता. माण) येथे लिंगायत समाज युवक मंडळ व लिंगायत समाजाच्यावतीने महात्मा बसवेश्वर यांची जयंती विविध कार्यक्रमानी साजरी केली. यावेळी आयोजित आशीर्वचन कार्यक्रमांमध्ये ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, लिंगायत धर्मात स्त्रियांना देखील शास्त्र पठण व संस्कृत स्तोत्र पठनाचा समान अधिकार देण्यात आला असून जातीभेद विरहित असा हा सर्व धर्म समभाव माणणारा एकमेव धर्म आहे. या धर्मातील तत्त्वज्ञान विश्वाला शांती देणारे आहे. या धर्माचे आचरण करून जीवन कृतर्थ बनवावे, म. बसवेश्वरांचे विचार जीवनात आचरणात आणावेत.
यावेळी लिंगायत समाजाच्या मठामध्ये महात्मा बसवेश्वरांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. महिलांनी श्री बसवेश्वर यांच्या प्रतिमा मूर्तीचे पाळण्यामध्ये आरोहन करून पंचोपचारी पूजा केली. महात्मा बसवेश्वर जयंती बसवेश्वरांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला या वेळेला महिला मंडळांनी श्री बसवेश्वर यांच्या प्रतिमा मूर्तीचे पाळण्यामध्ये आरोहन करुन पंचोपचारी पूजा केली. म्हसवड शहरातून भव्य मिरवणूक करण्यात आली होती.
सजवलेल्या रथातून महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याची शहरातील मुख्य रस्त्यावरून वाद्यांच्या गजरामध्ये मिरवणूक काढण्यात आली.मिरवणुकीमध्ये लिंगायत समाजाचे स्त्री, पुरुष सहभागी झाले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लिंगायत समाजाचे कार्यकर्ते कैलास भोरे, आतिष भोरे, अभिराज नागमल, संजय टाकणे, सचिन डोंबे, नागनाथ डोंबे, अजित स्वामी, राजकुमार डोंबे, राजेंद्र लाखे, संतोष शेटे, अमर ढोले, ऍड. महादेव डोंबे, ऍड. उत्तम डोंबे यांनी परिश्रम घेतले.