यवत – दौंड तालुक्यातील राहू गावच्या हद्दीतील चव्हाणवाडी येथे (दि.21 ऑगस्ट 2014) सात वर्षांच्या बालिकेवर बलात्कार केल्याची घटना घडली होती. यवत पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी गुन्ह्याचा तपास करीत आरोपीला जेरबंद केले होते. या गुन्ह्याचा खटला बारामती सत्र न्यायालयात सुरू होता.
बारामती सत्र न्यायालयाने शुक्रवारी (दि.2) या गुन्ह्याचा निकाल जाहीर केला असून आरोपी बाबू उर्फ नाना विश्वनाथ घोलवड (वय 29, रा. राहू, ता. दौंड) याला जन्मठेपेची शिक्षा व 50 हजार रुपयांचा दंड ठोटावला आहे.
पोलिसांनी आरोपी विरोधात दोषारोप पत्र बारामती येथील जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केले होते. पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पोलीस हवालदार विठ्ठल वारघड यांनी योग्य साक्षीदार वेळेत हजर केल्याने बारामती अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश राठी यांनी आरोपीला जन्मठेपेची व 50 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.