पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांसह मसूद अझहरचा भाऊ दिसला

नवी दिल्ली : जैश ए मोहम्मदचा म्होरक्‍या मसूद अझहरच्या भाऊ इब्राहिम अझहर पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये दिसल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्यासोबत 15 दहशतवाद्यांनाही पाहिले असल्याचेही सांगण्यात येत आहे. दरम्यान, या दहशतवाद्यांना जम्मू काश्‍मीरमध्ये घुसखोरी करण्यास प्रशिक्षण दिले जात आहे.

अमरनाथ यात्रेवर दहशतवाद्यांचे सावट असल्याचे सांगत सुरक्षेच्या कारणास्तव अमरनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. त्यानंतर शनिवारी पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये 15 दहशतवाद्यांसह इब्राहिम अझहर दिसल्याची माहिती समोर आली आहे. एका वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, इब्राहिम हा मरकज, सनान बिन सलमा, तरनब फार्म, पेशावर आणि खैबर पख्तूनख्वातील विविध दशतवादी तळांवर या दहशतवाद्यांसोबत दिसला आहे. दरम्यान, या दहसतवाद्यांना जम्मू काश्‍मीरमध्ये घुसखोरी करण्यासाठी तयार करण्यात आले असून त्यांचे प्रशिक्षण पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा येथील जमरूदमध्ये झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.