स्टिरिया – फॉर्म्युला वन शर्यतींच्या मोसमातील पहिल्याच शर्यतीत लुईस हॅमिल्टन याने विजेतेपद साकार केले. त्याने यंदाच्या मोसमात मर्सिडिझ संघाचे प्रतिनिधित्व केले.
या स्पर्धेसाठी शनिवारीच पोल पोझिशन जाहीर करण्यात आली होती. त्यातही हॅमिल्टनने प्रथम क्रमांक मिळवला होता. प्रत्यक्ष स्पर्धेतही त्यानेच वर्चस्व राखले. या शर्यतीत मर्सिडिझचाच वाल्टेर बोट्टास दुसऱ्या क्रमांकावर राहिला तर, रेड बूलच्या मॅक्स वेस्टपेनने तिसरे व मॅक्लरेनच्या एन्डो नॉरीसने चौथे स्थान मिळवले. या स्पर्धेसह केवळ ड्राइव्हर्सच्या पोझिशनमध्ये झालेल्या शर्यतीत बोट्टासने हॅमिल्टनला मागे टाकत पहिले स्थान मिळवले आहे.