बर्नमाउथ – इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल स्पर्धेत धक्कादायक निकाल नोंदवताना बर्नमाउथने लिसेस्टर सीटीचा 4-1 असा दणदणीत पराभव केला. या विजयामुळे बर्नमाउथचे आव्हान कायम राहिले आहे.
सामना सुरू झाल्यावर लिसेस्टरच्या जेमी वार्डीने 23 व्या मिनिटाला गोल केला व संघाला आघाडी प्राप्त करून दिली. मात्र, या आघाडीनंतर लिसेस्टरचा खेळ खालावला. पहिला हाफ संपेपर्यंत त्यांची आघाडी जरी कायम राहिली असली तरीही त्यांनी नंतर दुसरा हाफ सुरू झाल्यावर अत्यंत सामान्य चुका केल्या. डॉमिनिक सोलंकीने बर्नमाउथकडून दोन गोल केले. त्यापूर्वी ज्युनिअर टेनिसस्लासने 66 व्या मिनिटाला गोल करत संघाला बरोबरी प्राप्त करून दिली होती. मात्र, या सामन्यातील अत्यंत दर्जेदार खेळ सोलंकीने केला. त्याने 67 व 87 व्या मिनिटाला गोल करत यंदाच्या मोसमातील गोलचा दुष्काळ संपवला. त्यापूर्वी जॉनी इव्हान्सने 83 व्या मिनिटाला गोल केला.
सामन्यात आघाडी घेऊनही लिसेस्टरला हा सामना केवळ बचावातील अक्षम्य चुकांमुळे गमवावा लागला. बर्नमाउथने गुणतालिकेत 31 गुणांसह 18 वे स्थान मिळवत आगामी चॅम्पियन्स करंडक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रतेची संधीही मिळवली आहे. या गुणतालिकेत 59 गुणांसह चौथ्या क्रमांकावर असलेल्या लिसेस्टर सीटीला यंदाच्या स्पर्धेतील सर्वात लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला.