रविवार दिनांक १ मार्चला आबासाहेब गरवारे महाविद्यालय मध्ये डॉ. अविनाश धर्माधिकारी यांचे व्याख्यान व चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. कॉलेजच्या हिरक महोत्सवाचे निमित्त होते. यादरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासविषयी मार्गदर्शन केले.
“स्वतःवर विश्वास हा व्यक्तिमत्व विकासाचा प्रमुख पाया आहे” अशा शब्दांत त्यांनी आपले मत मांडले. या व्याख्यानासाठी विद्यार्थ्यांचा भरपूर प्रतिसाद मिळाला.
व्याख्यानानंतर प्रश्नोत्तराच्या सत्राने कार्यक्रमाचा समारोप झाला. यावेळी कॉलेजचे प्राचार्य व मान्यवर शिक्षक उपस्थित होते.
-निनाद कुलकर्णी,
कॉलेज रिपोर्टर,
आबासाहेब गरवारे महाविद्यालय