गोपीचंद पडळकर यांच्यासाठी काम करणार असल्याचे केले स्पष्ट
बारामती – येथील दलित चळवळीतील नेते ऍड. विजय गव्हाळे यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे नेते अविनाश मोटे यांच्या मध्यस्थीने पुणे येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला गव्हाळे यांच्या प्रवेशाने बारामतीतील दलित संघटन भाजपला जोडले गेले असल्याची चर्चा शहरात सध्या सुरू आहे.
पूर्वी मी भाजपमध्ये मोठ्या पदावर काम केले आहे, त्यानंतर काही तांत्रिक बाबींमुळे मी पक्षापासून दूर होतो आता पुन्हा मी स्वगृही परतलो आहे त्यामुळे भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्यासाठी काम करणार असल्याचे गव्हाळे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
बारामती विधानसभा मतदारसंघात प्रचाराचे वातावरण चांगलेच तापले आहे भाजप उमेदवाराच्या प्रचाराला देखील वेग आला आहे. भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा महायुतीच्या वतीने बारामती विधानसभा मतदारसंघात प्रचार सुरू आहे. त्यांच्या प्रचारात आपण उतणार असल्याचे गव्हाळे यांनी स्पष्ट केले आहे. त्यावेळी बारामती विधानसभा मतदारसंघाबाबत आपण बोलणार असल्याचे ते म्हणाले.
निष्ठावान कार्यकर्त्याला भाजपमध्ये नेहमीच संधी दिली जाते विजय गव्हाळे यांनी यापूर्वी बारामती नगरपरिषद त्यांची कामगिरी दाखवून दिले आहे. नगरपरिषदेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्या विरोधात त्यांनी सात नगरसेवक निवडून आले होते. दलित चळवळीतील त्यांचे नेतृत्व अध्याप कायम आहे. या संघटनात्मक काम कामाचा विचार भाजपमध्ये नक्कीच होईल, असे मत यावेळी पुणे जिल्ह्याचे सरचिटणीस अविनाश मोटे यांनी व्यक्त केले.