Lawrence Gang shooters arrested : दिल्लीतील व्हीव्हीआयपी परिसर असणाऱ्या वसंत कुंजमध्ये दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल आणि गॅंगस्टर यांच्यात चकमक झाली.या चकमकी दरम्यान, दिल्ली पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई गँगच्या दोन शूटर्सना अटक करण्यात यश मिळवले आहे. दरम्यान, या चकमकीची दिल्ली पोलिसांची गुन्हे शाखा या दोघांची चौकशी करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वसंत कुंज परिसरात दिल्ली पोलिसांचे स्पेशल सेल आणि लॉरेन्स गँगच्या शूटर्समध्ये चकमक झाली. दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. यादरम्यान दिल्ली पोलिसांनी दोन शूटर्सना पकडले. दोन्ही गोळीबार करणारे शूटर्स हे अल्पवयीन असून दोघांवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे.
Delhi Police Special Cell has apprehended two shooters of the Lawrence gang after a brief encounter in the Vasant Kunj area
Details awaited.
— ANI (@ANI) December 9, 2023
दिल्लीतील वसंत कुंज परिसरात झालेल्या चकमकीत दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या पथकाने अटक केलेल्या लॉरेन्स बिश्नोई टोळीचे दोन्ही शूटर यांचा पंजाबी बाग येथील माजी आमदाराच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेत सहभाग होता. आकाश आणि अखिल अशी दोन्ही शूटर्सची नावे आहेत. दोघेही दिल्लीला लागून असलेल्या हरियाणातील सोनीपत आणि चरखी दादरी येथील रहिवासी आहेत.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने केलेल्या चौकशीत या दोघांनी पंजाबचे माजी आमदार दीप मल्होत्रा यांच्या घरावर झालेल्या गोळीबारात सहभागी असल्याचे सांगितले. गँगस्टर गोल्डी ब्रारच्या सूचनेवरून माजी आमदार दीप मल्होत्रा यांच्या घरावर गोळीबार करण्यात आला. गोल्डीनेच पंजाबच्या माजी आमदाराला धमकीच्या व्हॉईस नोट्स पाठवल्या होत्या. तसेच वसुलीसाठी बोलावले होते. गोल्डीच्या सांगण्यावरून या दोघांनी पंजाबमधील एका माजी आमदाराची दारूची दुकाने जाळल्याची माहिती समोर येत आहे.