टोकियो – आधुनिक जगात स्पर्धेच्या काळामध्ये आपला व्यवसाय चालावा म्हणून विविध प्रकारच्या युक्त्या वापरल्या जातात जपानमधील एका हॉटेलने ग्राहकांची संख्या वाढावी म्हणून एका अनोख्या युक्तीचा वापर केला होता या हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या थोबाडीत मारण्याची सेवा या हॉटेलमध्ये दिली जात असे पण या हॉटेलचा हा उपक्रम सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर अखेर या हॉटेलला ही सेवा तात्पुरती बंद करत असल्याची माहिती दिली आहे.
जपान मधील नागोया शहरात हे शाचीहोकोया नावाचे हॉटेल असून या हॉटेलमध्ये किमोनो परिधान केलेल्या तरुणी ग्राहकांना त्यांच्या मागणीप्रमाणे थोबाडीत मारण्याचे काम करत असत 300 जापनीज येन म्हणजे सुमारे 170 रुपयांना ही अनोखी सेवा दिली जात असे जर ग्राहकांना एखाद्या विशिष्ट वेट्रेसकडूनच थोबाडीत हवी असेल तर मात्र 500 जापनीज येन द्यावे लागत असत ही अनोखी सेवा जपान मधील नागरिक आणि परकीय पर्यटकांमध्ये सुद्धा लोकप्रिय झाली होती.
पैसे देऊन थोबाडीत मारून घेतल्यानंतर हे ग्राहक अशी सेवा देणाऱ्या महिलांचे आभारही मानत असत या अनोख्या सेवेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त झाल्या त्यानंतर या हॉटेलने आपण या प्रकारची सेवा तात्पुरती बंद करत आहोत अशी घोषणा केली आहे.
2012 मध्ये या हॉटेलने ही अनोखी सेवा सुरू केली होती त्यानंतर या हॉटेलच्या व्यवसायातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती पण या सेवेचे व्हिडिओ जसजसे व्हायरल व्हायला लागले तसतसे सुलट प्रतिक्रियाही येऊ लागल्या त्यामुळे या हॉटेलने ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे जुने व्हिडिओ बघून ग्राहकांनी ही सेवा मिळेल म्हणून आमच्या हॉटेलमध्ये येऊ नये असे आवाहन आता हॉटेलच्या व्यवस्थापनाने केले आहे गेल्या दहा-बारा वर्षांच्या कालावधीमध्ये या हॉटेलमध्ये या सेवेची मागणी वाढल्यानंतर हॉटेलच्या व्यवस्थापनाने काही विशेष मुलींचीही नियुक्ती केली होती पण आता या मुलींचा रोजगारही संकटात आला आहे.