मंचर – सरकारने वृद्ध कलावंताच्या मानधनात वाढ केल्याने अनेक कलावंतांना वृद्धापकाळात दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारने घेतलेल्या मानधन वाढीच्या निर्णयामुळे 26 हजार वृद्ध कलावंतांना फायदा होणार आहे, अशी माहिती वारकरी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. अशोक महाराज काळे यांनी दिली.
यापूर्वी अ वर्ग कलावंतांना 2 हजार 100 रुपये दरमहा मिळायचे ते आता 3 हजार 150 रुपये मिळणार आहेत. ब वर्ग कलावंतांना 1 हजार 800 रुपये मिळायचे. त्यांना आता 2 हजार 700 रुपये मिळणार आहेत. तर क वर्ग कलावंतांना 1 हजार 500 रुपये मिळायचे ते आता 2 हजार 250 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे वृद्ध कलावंतांनी समाधान व्यक्त केले आहे.