पुणे – ससून रुग्णालयातून (Sassoon Hospital) पसार झालेला अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलच्या (Lalit Patil) दोन मैत्रिणींना पुणे पोलिसांनी नाशिकमधून अटक केली. त्या दोघी ललित पाटीलच्या (Lalit Patil) संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान दोघींना न्यायालयाने 23 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. .
ऍड.प्रज्ञा कांबळे(39, दत्त मंदिर चौक, नाशिक) आणि अर्चना निकम(33, रा.समर्थनगर, नाशिक) अशी दोघींची नावे आहे. त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायाधीश एस.सी.बिराजदार यांनी त्यांना पोलीस कोठडी सुनावली गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने ही कारवाई केली .
ससून रूग्णालयातून पसार झालेला अमली पदार्थ तस्कर ललितला चेन्नईत मुंबई पोलिसांच्या पथकाने पकडले. त्याला मुंबईतील न्यायालयाने शनिवारपर्यंत (21 ऑक्टोबर) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ससून रुग्णालयातून पसार झाल्यानंतर ललितने नाशिकमधील मैत्रिणींकडून 25 लाख रुपये घेतले होते.
चेन्नईतून तो श्रीलंकेत पसार होण्याच्या तयारीत होता. मागील पंधरा दिवस पुणे पोलिसांचे पथक त्याला पकडण्यासाठी दिवसरात्र तपास करत होते. ललितने ससून ते चेन्नईपर्यंत प्रवास कसा केला. त्याला आश्रय कोणी दिला ? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.
ललितला त्याच्या मैत्रिणींनी पसार होण्यास मदत केल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे पोलिसांच्या पथकाने दोघींना अटक केली. यातील ऍड.प्रज्ञा कांबळे बद्दल पुणे पोलिसांना अगोदर पासून संशय होता.
ती त्याची कायदेशीर सल्लागारही होती. ललित पळून गेल्यावर पोलीस तीच्या आणि भुषण पाटीलच्या मागावर होते. मात्र भुषण पाटील सापडल्यानंतरही ती हाती लागली नव्ह