मुंबई – ‘स्री’ आणि ‘लुका छुपी’च्या यशानंतर दिनेश विजान पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी “हम दो, हमारे दो’ चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटात बॉलिवूडचे दोन आघाडीचे कलाकार झळकणार आहेत. अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री कृति सेनन चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला असून, आज “हम दो हमारे दो’चा धमाकेदार ट्रेलर सुद्धा प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटाचा ट्रेलर ‘स्री, लुका छुपी, बाला आणि मिमी’ यासारख्या चित्रपटांच्या उल्लेखाने होते.
View this post on Instagram
यानंतर कृति आणि राजकुमार यांना इंट्रोड्यूस करत ट्रेलरमध्ये अभिनेते परेश रावल आणि रत्ना पाठक शाह यांची एंट्री दाखवली आहे. या चित्रपटाची कथा अभिषेक जैन, प्रशांत झा आणि अभिजीत खुमान यांनी लिहिली आहे.
View this post on Instagram
“हम दो हमारे दो’ हा चित्रपट एका युवा जोडप्यावर आधारित असून ते आपल्या जीवनातील एकटेपणा दुर करण्यासाठी आई-वडिलांना दत्तक घेण्याचा निर्णय घेतात. यावरच हा संपूर्ण चित्रपट आधारित आहे.