सोलापूर – राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल आणि माजी महापौर नलिनी चंदेले यांनी कॉंग्रेसला सोड चिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. यावर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, खरटमल हे पूर्वीच पक्षापासून दूर गेले होते तर चंदेले यांनी पक्षाचे काम सोडले होते. त्यामुळे जे आमचे नव्हतेच त्यांच्या पक्षांतराने काही फरक पडणार नाही असे भाष्य त्यांनी केले आहे.
राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी, शिवसेना व कॉंग्रेसची महाविकास आघाडी स्थापन झाली. वास्तविक पाहता पाच वर्षे सरकार टिकावे म्हणून तिन्ही पक्षातील नाराजांना एकमेकांच्या पक्षात घेऊ नये, असा अलिखित प्रोटोकॉल तयार झाला. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तो प्रोटोकॉल बाजूला ठेवला जात असल्याची स्थिती पाहायला मिळत आहे.