मुंबई – इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू जोस बटलर यंदाच्या आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे. या संघातील भारतीय नवोदित गोलंदाज प्रसिध कृष्णा याच्या गोलंदाजीमुळे प्रभावित झाल्याचे म्हटले आहे. येत्या काळात हा गोलंदाज जगभरात प्रसिद्ध होइल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला आहे.
यंदाच्या आयपीएल स्पर्धेत राजस्थानने दोन्ही सामने जिंकले असून त्यांची कामगिरी सर्वच क्षेत्रात कमालीची सातत्यपूर्ण होत आहे. या विजयात कृष्णाचेही मोठे योगदान आहे. कृष्णामध्ये अफाट गुणवत्ता आहे. तो क्रिकेटच्या तीनही प्रकारात भारतीय संघात सातत्याने स्थान मिळवेल. त्याने भारतीय संघाकडून वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत आपला वेग आणि बाऊन्सने सर्वांनाच चकित केले आहे. त्याच्या याच गुणवत्तेमुळे तो आगामी काळात भारतीय संघाचा मोठा आधारस्तंभ बनेल, असा विश्वासही वटलरने व्यक्त केला आहे.