कोल्हापूर – शहरात आज पोलिसांना 39 गावठी बॉम्बचा साठा सापड्ल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यासोबत काही स्फोटक साहित्यही मिळाले आहे. माले मूडशिंगी गावात हा बॉम्बसाठा सापडला असल्याची माहिती मिळाली आहे. हे बॉम्ब रानडुकराची शिकार करण्यासाठी तयार करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
#Maharashtra: Kolhapur police has arrested 2 persons with 39 crude bombs & some explosive material. Police has prima facie found that these bombs were made for wild boar hunting, further investigation is being conducted.
— ANI (@ANI) October 23, 2019
दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी गुरुवारी पार पडणार असून त्याच्या आधी अशा पद्धतीने जिल्ह्यात बॉम्बसाठा सापडल्याने खळबळ उडाली आहे. कोल्हापुरात मतदानाच्या दिवशीदेखील एक स्फोट झाला होता. यानंतर पोलिसांनी चौकशी सुरु केली होती. यावेळी शिकारीसाठी बॉम्ब वापरले जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. दरम्यान दोघांना याप्रकरणी अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरु आहे