कोल्हापूर – कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या मतदार संघात 12 एप्रिल रोजी मतदान होणार असून 16 एप्रिल रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात येणार आहे. या मतदार संघात आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाचे तत्कालीन आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनामुळे या मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. या ठिकाणी केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघासाठी निवडणुकीची अधिसूचना 17 मार्चला जाहीर होणार असून अर्ज भरण्याची मुदत दि. 17 मार्च ते 24 मार्च 2022 असणार आहे.
यानंतर अर्जाची छाननी 25 मार्च रोजी करण्यात येणार असून 28 मार्चपर्यत उमेदवारी अर्ज माघार घेता येणार आहे. तसेच पोटनिवडणुकीसाठी 12 एप्रिल रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल आणि 16 एप्रिल रोजी निका घोषित करण्या येणार आहे.