पुणे – पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यात अध्यक्षपदी नंदकुमार सागर, कार्याध्यक्ष मधुकर नाईक तर सचिव प्रसाद गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
जिल्हा संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा मुख्याध्यापक संघाच्या कार्यालयामध्ये हरिश्चंद्र गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यामध्ये 2022 ते 2025 या तीन वर्षासाठी जिल्हा कार्यकारणीची निवड करण्यात आली.
यावेळी संघाचे विश्वस्त हनुमंत कुबडे, शिवाजीराव किलकिले, अरूण थोरात, आदिनाथ थोरात, चंद्रकांत मोहोळ, कुंडलिक मेमाणे, रामदास जगताप, भगवंत बेंद्रे, शिवाजीराव कोलते यांच्यासह तालुका अध्यक्ष, सचिव आणि जिल्हा कौन्सिलर सदस्य यांनी अनेक शैक्षणिक विषयांवर चर्चा केली. त्यामध्ये वार्षिक अहवाल सादर करण्यात आला.
कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी सुरेश कांचन, रामराव पाडुळे, नागनाथ ठेंगल, तबाजी वागदरे, रामदास थिटे, विठ्ठल चिकणे, राजेश गायकवाड,सहसचिवपदी कल्याण बरडे, मारूती कदम, विठ्ठल कुंभार, दत्तात्रय मांजरे, सुधाकर जगदाळे, विद्यासचिव पदी अनिता सांळुखे, विद्यासहसचिव पदी उत्तमराव पोटवडे, विकास फलफले, अजित कोंढाळकर, विनोद बोंबले, खजिनदारपदी शिवाजी कामथे, सहखजिनदारपदी मारूती ढोबळे, मोहन ताकवले, वार्तापत्र संपादकपदी सुजित जगताप, सहसंपादकपदी विनायक सुंबे, अशोक जाधव, साधना दातीर, अंतर्गत हिशोब तपासणीसपदी गणपत गवळी, सहहिशोब तपासणीसपदी बी. बी. पाटील, सुभाष वाल्हेकर, अध्यक्ष प्रतिनिधी कैलास पवळे, हनुमंत पवार, संभाजी पडवळ,अशोक काकडे, सन्मानित सदस्यपदी महेंद्र गणपुले, हरिश्चंद्र गायकवाड, शांताराम पोखरकर, कुंडलिक मेमाणे, आदिनाथ थोरात, चंद्रकांत मोहोळ आदींचा यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या सभेचे सुत्रसंचालन सुरेश कांचन यांनी केले तर आभार प्रसाद गायकवाड यांनी मानले.