कोल्हापूर (प्रतिनिधी) – कोल्हापुरात आणखी एक कोरोना बाधित रुग्ण सापडला असून कोरोनाग्रस्तांची संख्या ३ वर गेली आहे. कसबा बावडा येथील ६५ वर्षीय महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात एकही नवा रुग्ण आढळला नव्हता, मात्र आज नवा रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोरोना बाधित महिला ही कसबा बावड्यातील मराठा कॉलनीतील आहे. या महिलेचा अहवाल सीपीआर प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे. ही महिला काही दिवसांपूर्वीच साताऱ्याहून कोल्हापुरात आली असल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. भक्तीपुजानगर नंतर कसबा बावड्यात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने कोल्हापूरकरांत भीतीचे वातावरण आहे.