कोल्हापूर : दोघा गुन्हेगारांकडून 4 देशी बनावटीचे पिस्तूल, मॅगझीन आणि आठ जिवंत राऊंड जप्त

कोल्हापूर पोलिसांच्या इचलकरंजी स्थानिक गुन्हे शोध पथकाची कारवाई

कोल्हापूर – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघा रेकाॅर्डवरील गुन्हेगारांकडून देशी बनावटीचे 4 गावठी पिस्तूल, मॅगझीन आणि 8 जिवंत राऊंड जप्त करण्यात आले आहेत. कोल्हापूर पोलिसांच्या इचलकरंजी स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. गेल्या पंधरा दिवसांतील कोल्हापूर पोलिसांची बेकायदा बंदुका वापरणाऱ्या वर आणि विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर तिसरी मोठी कारवाई आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा पोलिस दलाने बेकायदा शस्त्र बाळगणे आणि विक्री करणे अशांवरती कारवाईचा धडाका लावला आहे. कोल्हापूर पोलिसांच्या इचलकरंजी च्या स्थानिक गुन्हे शोध पथकाला एक इसम चंदगड परिसरामध्ये शस्त्रविक्री करायला येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने चंदगड परिसरात आपला सापळा रचला. यावेळी चंदगड तालुक्यात राहणारा विकी धोंडीबा नाईक आणि कोल्हापुर लक्षतीर्थ वसाहत मध्ये राहणारा सुनील भिकाजी घाटगे या दोघांचा शस्त्र विक्रीसाठी आल्याचा संशय आल्यानं त्यांनी दोघांना ताब्यात घेतलं आणि चौकशी केली तसेच त्यांच्या बँगेची झडती घेतली त्यामध्ये या दोघांकडून ४ देशी बनावटीचे गावठी पिस्तूल, १ मॅक्सिन आणि ८ जिवंत राउंड असा २ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटकेतील दोघेही रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून कोल्हापूर पोलिसांची आजवरची सर्वात मोठी कारवाई असल्याचं सांगण्यात येत आहे.

या कामगिरीवर बोलताना पोलीस अधीक्षक ( कोल्हापूर) अभिनव देशमुख म्हणाले की, “लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूर पोलिसांनी केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे, त्यामुळे गुन्हेगारांवर वचक बसण्यास नक्कीच मदत होईल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.