राहुल गांधींना सभ्यतेचा विसर : पियुष गोयल

नवी दिल्ली : भाजपचे जेष्ठ नेते पियुष गोयल यांनी आज राहुल गांधींनी एका जाहीर सभेमध्ये लालकृष्ण अडवाणींबाबत वक्तव्य करताना वापरलेल्या शब्दांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. उत्तराखंड येथील हरिद्वारमध्ये एका जाहीर सभेला संबोधताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत असताना, “मोदींचे गुरु असलेल्या अडवाणींना आज पक्षात कशाप्रकारची वागणूक मिळत आहे? अडवाणींना लाथ मारून स्टेजवरून खाली उतरविण्यात आलं आहे.” असं वक्तव्य केलं होत.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्षांच्या या वक्तव्यावरून आता भाजप नेत्यांनी आक्षेप नोंदवायला सुरुवात केली असून भाजप नेते पियुष गोयल यांनी याबाबत बोलताना, “निवडणुकांमध्ये पराभव समोर दिसत असल्याने काँग्रेसपुर्णपणे हताश झाली असून त्यामुळेच अशाप्रकारची निवडणुकांचा स्तर खाली पडणारी वक्तव्य केली जात आहेत. मला वाटत की राहुल गांधी सभ्यता विसरले आहेत.”

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.