गांधीनगर – भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा हे गुजरातच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अमित शहा यांनी शनिवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या अर्जासोबत जोडण्यात आलेल्या शपथपत्रात, स्वतःच्या संपत्तीविषयीची माहिती लपवल्याची तक्रार काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे दाखल केली आहे. या तक्रारीत काँग्रेसने अमित शाहांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याची मागणी केली आहे.
अमित शाहांनी त्यांच्या शपथपत्रामध्ये दोन ठिकाणी चुकीची माहिती दिल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. अमित शहा यांनी त्यांच्या गांधीनगरमध्ये असलेल्या एका प्लॉट आणि मुलाच्या कर्जाबाबत खोटी माहिती दिल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे.