-कोणतेही वाईट व्यसन शरीरास घातकच असते आणि ते सोडल्याने आपल्याला शारीरिक, मानसिक अर्थिक व सामाजिक लाभ होतात.
-कोणतेही व्यसन हे आपण स्वत:च्या दृढ निश्चयावरून प्रियजनांच्या सांगण्यावरून किंवा दुष्परिणामांना घाबरून सोडतो.
शारीरिक फायदे
-स्वत:चे स्वास्थ्य सुधारते.
-कर्करोग व हृदयरोग होण्याचा धोका कमी होतो.
-श्वसन संस्थेच्या आजाराचे प्रमाण कमी होते.
-अन्न चवीला व वासाला चांगले लागते.
-पुरुषांचे लैंगिक सामर्थ्य वाढते.
-जर अगोदरच हृदयविकार असेल तर धूम्रपान सोडल्याने हृदयशुलाची तीव्रता आणि वारंवारता कमी होते.
-मौखिक स्वास्थ्य सुधारते.
-दात स्वच्छ राहण्यास मदत होते.
-आयुष्यमान वाढते.
आर्थिक फायदे
-तंबाखूजन्य पदार्थांवर खर्च होणारे पैसे वाचतील व त्या पैशात इतर आवश्यक गोष्टी घेता येतील.
आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते.
-तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या आजारांवरील खर्च टळल्याने खूप मोठी आर्थिक बचत होईल.
दीर्घकालीन लाभ
-धूम्रपान सोडल्यानंतर 5 वर्षांनी पूर्वीपेक्षा फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या मृत्यूचा धोका 60 % कमी असतो.
-धूम्रपान सोडल्यानंतर 15 वर्षांनी फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका धूम्रपान करणाऱ्यांपेक्षा कमी होतो.
-धूम्रपान सोडल्यानंतर 1 वर्षात हृदयविकाराचा धोका 50% ने कमी होतो.