सुपरस्टार प्रभास सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे खूपच चर्चेत आहे. आदिपुरुष, राधे श्याम आणि दीपिका पादुकोणबरोबरच्या सायन्स फिक्शन चित्रपटानंतर आता प्रभासने दिग्दर्शक प्रशांत नील यांचा पुढील चित्रपट साइन केला आहे.
या चित्रपटाचे नाव “सलार’ असे असून हा एक ऍक्शन चित्रपट असणार आहे. प्रशांत नीलने नुकतीच हैदराबादमध्ये प्रभासची भेट घेतली. त्यानंतर प्रभासने चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर या चित्रपटास होकार दर्शविला. या चित्रपटातील पहिला लूक प्रभासने सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो खूपच इंटेंस आहे. या पोस्टरमध्ये प्रभास हा गन घेऊन बसल्याचा दिसत आहे.
View this post on Instagram
या चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षी जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. यात प्रभाससोबत कोणती अभिनेत्री झळकणार आहे हे अद्याप समजू शकले नाही. सध्या प्रशांत त्याच्या आगामी “केजीएफ ः चॅप्टर 2′ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास प्रभास आणखी एका चित्रपटासाठी चर्चेत आहे जो ओम राऊत साकारणार आहे. या चित्रपटाचे नाव “आदिपुरुष’ आहे, जो पीरियड ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटात प्रभास हा रामची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात सैफ अली खान लंकेशची भूमिका साकारणार आहे.