मुंबई – पुणे महापालिकेमध्ये शनिवारी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांकडून धक्काबुक्की करण्यात आली. सोमय्या महापालिकेत आले असता त्यांना निवेदन देण्यासाठी काही शिवसैनिक त्याठिकाणी आले होते. त्यावेळीच ही घटना घडली.
धक्काबुक्कीची घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून यामध्ये धक्काबुक्कीमुळे सोमय्या पालिकेच्या पायऱ्यांवरून खाली कोसळल्याचे दिसतात. या घटनेनंतर सोमय्या यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होता. आता त्यांना रुग्णालयातून सुट्टी मिळाली आहे.
मला मारहाण केल्याप्रकरणी पुणे अध्यक्ष संजय मोरे यांच्यासह 8 शिवसेना नेत्यांना पोलीस अटक करणार आहेत.
FIR एफआयआर क्रमांक
आयपीसी कलम १४३, १४७, १४९, ३४१, ३३६, ३३७, ३२३, ५०४, ३७(१), १३५ @BJP4Maharashtra pic.twitter.com/2gqqtJE7EU
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) February 6, 2022
रुग्णालयातून बाहेर येताच सोमय्या यांनी ट्विट करून शिवसेनेला आव्हान दिलं आहे. तसेच मला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे पुणे अध्यक्ष संजय मोरे यांच्यासह 8 शिवसेना नेत्यांना पोलीस अटक करणार असल्याचं म्हटलं आहे. सोमय्या यांनी ट्विट करून या संदर्भात माहिती दिली.