Kiran Kher | Lok Sabha Election 2024 – चंदीगड या केंद्रशासित प्रदेशातील एकमेव लोकसभा मतदार संघात भाजपने तेथील दहा वर्षांच्या खासदार अभिनेत्री किरण खेर यांना उमेदवारी नाकारली आहे. त्यांच्या जागी भाजपने संजय टंडन यांना उमेदवारी घोषित केली आहे.
ते सध्या हिमाचल प्रदेशचे भाजपचे सह-प्रभारी म्हणून काम करीत आहेत. टंडन यांनी भाजपचे शहराध्यक्ष म्हणून दहा वर्ष काम केले आहे. टंडन, छत्तीसगडचे माजी राज्यपाल दिवंगत बलरामजी दास टंडन यांचे चिरंजीव आहेत.
भाजपने आपल्या १०व्या यादीत लोकसभेच्या एकूण नऊ जागांसाठी उमेदवार जाहीर केले – उत्तर प्रदेशातील सात आणि चंदीगड आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. । Kiran Kher | Lok Sabha Election 2024
किरण खेर पहिल्यांदा २०१४ मध्ये चंदीगडमधून खासदार झाल्या. २०१९ मध्ये त्या पुन्हा चंदीगडमधून विजयी झाल्या.त्यांना यंदाही उमेदवारी अपेक्षित हेाती परंतु पक्षाने त्यांना यावेळी संधी नाकरली आहे. । Kiran Kher | Lok Sabha Election 2024