नगर – विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये खिंडार पडायला सुरुवात झालेली असतानाच स्थानिक पातळीवर अंतर्गत वाद राष्ट्रवादी मध्ये उफाळलं आला. प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष किरण काळे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सुपूर्त केला असल्याची माहिती किरण काळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
काळे म्हणाले की, मी गेल्या नऊ वर्षांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये काम करत होतो पक्षातील स्थानिक नेतृत्व नगर शहराच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने योग्य नाही, मला आणि सामान्य नगरकरांनी प्रतीक्षा असणाऱ्या नगर विकासाच्या दृष्टीने मी लवकरच महत्त्वपूर्ण निर्णय घेणार आहे, याच कारणामुळे मी माझ्या पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाकडे आज दिला.
समाजातील नेतृत्व करण्यासाठी शहरात व्हीजन असलेल्यांना नेतृत्व दिले जावे यासाठी देखील पक्षात कायम आग्रह धरत होतो परंतु यामध्ये दुर्देवाने मागील अप्रिय निर्णयाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्यावेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगून देखील स्थानिक नेतृत्वाने पक्षविरोधी निर्णय घेतला ..आत्ता देखील सर्व पक्षांचे उंबरठे झिजवून झाल्यानंतर स्वतःच्या प्रसिद्ध कार्य कौशल्यामुळे आपल्याला कोणीही कोणत्या पक्षात प्रवेश घ्यायला तयार नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांना पुन्हा राष्ट्रवादीची आठवण झाली असा टोला त्यांनी आमदार अरुण जगताप व संग्राम जगताप यांचे नाव न घेता यावेळी लगावला आहे.