Dhangar reservation : बारामतीत धनगर आरक्षणाचा (Dhangar reservation) प्रश्न आता गंभीर बनत चालला आहे. उपोषण कर्त्याची प्रकृती आता खालावली असून आजचा उपोषणाचा दहावा दिवस आहे. तरी देखील सरकारचा कोणताही प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहिल्या नसल्याने धनगर बांधव आता आक्रमक झाला आहे.
आता महाराष्ट्रातील 288 तर 48 खासदारांच्या दारात शांततेच्या मार्गाने बसण्याच्या सूचना उपोषण कर्ते चंद्रकांत वाघमोडे यांनी महाराष्ट्रातील धनगर बांधवांना (Dhangar reservation) केल्या आहेत.
जोपर्यंत आमदार आणि खासदार धनगर एसटी आरक्षणाच्या बाबत पाठिंबाचे पत्र आणि नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करण्याचा वचननामा देत नाही तोपर्यंत त्यांच्या दारात आंदोलन सुरूच ठेवण्यांच्या सूचना उपोषण कर्ते चंद्रकांत वाघमोडे यांनी धनगर बांधवांना दिल्या आहेत.