मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी खट्टर यांचा रेल्व व दुचाकीवरून प्रवास

चंदीगड – हरियाना विधानसभेच्या मतदानासाठी त्या राज्याचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आज प्रथम रेल्वेने आणि नंतर दुचाकी वाहनावरून प्रवास करून आपले मतदान केंद्र गाठले. त्यासाठी ते प्रथम चंदीगड वरून कर्नालला रेल्वेने गेले.

प्रवासात सह प्रवाशांशी मोकळेपणाने चर्चा करण्यासाठी आपण हा प्रवास केला असे ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी ई रिक्षाने आणि व शेवटच्या टप्प्यात दुचाकीवरून कर्नाल मधील आपले मतदान केंद्र गाठले. 65 वर्षीय खट्टर हे हरियानात प्रथमच आमदार बनले असून पहिल्याच टर्म मध्ये त्यांना मुख्यमंत्रीपदाचा मान मिळाला आणि त्यांनी आपली पहिली टर्म पुर्ण करून आता त्यांनी मतदारांकडून दुसऱ्या टर्मसाठी आशिर्वाद मागितले आहेत.

हरियानात सर्वच मतदार संघात मतदार मोठ्या प्रमाणात मतदानाला येत आहेत अशी माहितीही त्यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना दिली. 90 जागांच्या हरियाना विधानसभेत भाजपला यंदा 75 जागा मिळतील असा विश्‍वास भाजपने व्यक्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.