हाच भाजपमधील सर्वात प्रामाणिक नेता

भाजप उमेदवाराच्या वक्तव्यावर राहुल गांधी यांची प्रतिक्रीया

नवी दिल्ली- भाजपच्या हरियानातील एका उमेदवाराने एका सभेत बोलताना तुम्ही कोणतेही बटन दाबा शेवटी ते मत भाजपलाच म्हणजे आम्हालाच मिळणार आहे असे जे वक्तव्य केल्याचे एका व्हिडीओ चित्रफितीतून दिसून आले आहे त्यावरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपची खिल्ली उडवण्याची संधी साधली आहे. हाच भाजपमधील सर्वात प्रामाणिक नेता आहे असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

भाजपचे विद्यमान आमदार आणि चालू निवडणुकीतील उमेदवार बक्षिसिंग विर्क यांनी एका प्रचार सभेत बोलताना हे विधान केले आहे त्याची निवडणूक आयोगानेहीं दखल घेऊन त्यांना नोटीस बजावली आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओही राहुल गांधी यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

त्यात बक्षिसिंग असे म्हणताना दिसून आले आहे की आम्ही ईव्हीएम मध्ये अशी चीप सेट केली आहे की तुम्ही कोणालाही मतदान केले तरी ते मत शेवटी आम्हालाच (भाजपला) मिळणार आहे.दरम्यान स्वत: बक्षिसिंग यांनी हा व्हिडीओ बनावट असल्याचे म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.