जळगाव : भाजपने जाहीर केलेल्या दोनही उमेदवार याद्यांमधून जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांना डावलण्यात आले आहे. भाजप खडसेंना तिकीट देत नसल्याच्या निषेधार्थ रावेर येथील नानाभाऊ महाजन या खडसे समर्थकाने अंगावर रॉकेल टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या प्रकारानंतर एकनाथ खडसे आणि इतर कार्यकर्त्यांनी नानाभाऊ यांची समजूत घातली आहे.
दरम्यान भाजपाकडून तिकीट मिळणार नसल्याचं जवळपास फिक्स झाल्याने स्वत: खडसेंनीच पत्रकार परिषद घेऊन याबाबत खुलासा केला आहे. मात्र, मी पक्षाशी एकनिष्ठ राहणार असल्याचेही खडसेंनी यावेळी सांगितल
माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या उमेदवारी संदर्भात कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड प्रमाणात रोष दिसत असून, मुक्ताई नगर येथील खडसे फार्म हाऊससमोर उमेदवारी न दिल्याचा निषेधार्थ कार्यकर्त्यांची निदर्शने आणि रास्ता रोको केला आहे.
खडसे फार्महाऊसमध्ये जमलेले सर्वच कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे महामार्ग क्रमांक 46 पूर्णपणे ठप्प झाला असून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. या रास्तारोको दरम्यान, एका कार्यकर्त्याने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा इशारा दिला होता. मात्र, खडसेंनी स्वत: फोनवरुन कार्यकर्त्याची समजूत घातली आहे.