जळगाव – रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून पुन्हा एकदा रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तसेच जळगाव लोकसभा मतदारसंघात स्मिता वाघ यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. आज रक्षा खडसे आणि स्मिता वाघ यांनी जळगावात मोठं शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभेसाठी रक्षा खडसे तर जळगाव लोकसभेसाठी स्मिता वाघ यांनी सकाळीच आपापले नामनिर्देशन पत्र जिल्हाधिकारी कार्यालयात गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण, आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे,
जिल्हाध्यक्ष अमोल जावडे, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नामदार अनिल भाईदास पाटील, उमेश नेमाडे या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत भरले. यानंतर रक्षा खडसे आणि स्मिता वाघ यांच्या प्रचारार्थ जळगावात जाहीर सभा पार पडली.