वॉशिंग्टन :- टिक- टॉक कंपनीचे अमेरिकेतील मुख्य कार्यकारी अधिकारी केवीन मेअर यांनी राजीनामा दिला आहे. ते 1 जूनपासून या कंपनीत रूजू झाले होते. दरम्यानच्या, काळामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या कंपनीवर बंदीची घोषणा केली आहे.
मेअर यांनी कर्मचाऱ्यांना पाठविलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, मी आशावादी मानसिक अवस्थेत कंपनीत रूजू झालो होतो. मात्र, मी आता राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, टिक-टॉकचा अमेरिकेतील व्यवहार विकत घेण्यासाठी अनेक कंपन्या प्रयत्न करीत आहेत. त्यातच गुगल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी गुगल ही कंपनी खरेदी करण्याचा प्रयत्न करीत नसल्याचे म्हटले आहे. मायक्रोसॉफ्ट व ट्विटर या कंपन्यांही कंपनी विकत घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे वृत्त आहे.