वाघोली -केसनंद (ता. हवेली) येथील 48 वर्षीय रुग्णाने करोनावर मात केली आहे. तो घरी परतल्यानंतर ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गजरात व फुलांच्या वर्षात त्याचे स्वागत केले. केसनंदमध्ये आता कोणीही करोनारुग्ण नसल्याने गाव करोनामुक्त झाले असले तरी प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेतली जात आहे.
नागरिकांनी करोना टाळण्यासाठी सुरक्षितता बाळगून रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी शक्य होईल तेवढे प्रयत्न केले पाहिजे. गरम पाणी प्यावे, मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंगचे बाहेर व घरातसुद्धा पालन करावे, असे आवाहन करोनामुक्त झालेल्या व्यक्तीने केले आहे.