नवी दिल्ली : कर्णधार सौम्या गुगुलोथच्या शानदार दोन गोलच्या जोरावर केंकरे एफसी संघाने इंडियन वुमेन लीग फुटबाॅल स्पर्धेच्या सामन्यात सोमवारी श्रीभूमि एफसी संघाचा ३-१ ने पराभव करत विजय नोंदविला. या विजयासह स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित करण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकलं आहे.
FULL TIME! Kenkre take a big step towards the semifinals 👏 with a hard-fought win against Sreebhumi 🤜🤛
FT Score: SRB 1⃣-3⃣ KEN#HeroIWL 🏆 #ShePower 👧 #IndianFootball ⚽️ #SRBKEN ⚔️ pic.twitter.com/uJofXZ2Wcx
— Indian Football Team (@IndianFootball) February 3, 2020
केंकरे एफसी संघाकडून सौम्याने सामन्याच्या ५ व्या आणि १८ व्या मिनिटाला गोल केला. त्यानंतर आरतीने ३३ व्या मिनिटाला गोल करत संघास ३-० ने आघाडीवर नेले. श्रीभूमि एफसी संघाकडून आशा कुमारीने ४७ व्या मिनिटाला एकमेव गोल केला.
Last round of matches left in the group stage! Who are you rooting for? 🔥⚡️#HeroIWL 🏆 #ShePower 👧 #IndianFootball ⚽️ pic.twitter.com/akj1sHn5e8
— Indian Football Team (@IndianFootball) February 4, 2020
या पराभवसह श्रीभूमि एफसीचा संघाच्या उपांत्य फेरीत पोहचण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. केंकरे संघाचे ९ गुण झाले असून ‘ब’ गटात गुणतालिकेत ते दुस-या स्थानी आहेत तर श्रीभूमि संघांची चौथ्या स्थानी घसरण झाली आहे.