नवी दिल्ली – भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानावर हल्ला केला. त्यांच्या निवासस्थानाबाहेरच्या मालमत्तेचे नुकसान केले. सीसीटीव्ही तोडले. बॅरिकेड् तोडले. सीमाभींतीचे ही नुकसान केले. केंद्र सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या दिल्ली पोलिसांच्या यावेळच्या भुमिकेबाबत साशंकता व्यक्त करणारे आरोप होत आहेत.
समाज कंटकांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानावर हल्ला केला. त्यांनी सीसीटीव्ही तोडले. निवासस्थानात येण्यासाठी लावलेले अडथळेही त्यांनी मोडले असल्याचे ट्विट उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी ट्विट केले. अन्य एका ट्विटमध्ये ते म्हणातात, मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थानाची भाजपाच्या गुंडांनी नासधूस केली. त्यांना रोखण्याऐवजी भाजपाचे पोलीस त्यांना त्यांच्या दरवाजापर्यंत घेऊन आले.
हा एक व्यापक कट असून भाजप केजरीवाल यांना पराभूत करू शकत नसल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने ते केजरीवाल यांच्या हत्येचा प्रयत्न करत आहेत. असा आरोपही सिसोदिया यांनी केला.
ही घटना घडली त्यावेळी सुरु असणाऱ्या निदर्शनाचे नेतृत्व भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्य आणि राष्ट्रीय सरचिटणीस तेजिंदरपालसिंग बग्गा यांनी केले. काश्मिर फाईल्स या चित्रपटाबाबत केजरीवाल यांनी विधानसभेत केलेल्या भाषणातील वक्तव्याचा निषेध म्हणून ही निदर्शने करण्यात येत होती. चुकीच्या चित्रपटाचा प्रसार करू नका. चुकीच्या चित्रपटाची पोस्टर फडकावू नका, असे भाजपा नेत्यांना सांगत चित्रपटाच्या निर्मात्याने काश्मिरी पंडीतांच्या वेदनेचा व्यवसाय केला, अशी टीका केजरीवाल यांनी केली होती.
सिसोदिया यांनी केलेले आरोप फेटाळून लावत बग्गा म्हणाले, काश्मिरी हिंदुंच्या छळाला विरोध करणे हे समाजकंटक असणे असेल तर आम्ही समाज कंटक आहोत. जर काश्मिरी पंडितांच्या नरसंहारावरील केजरीवाल यांच्या विधानावर माफी मागणे जर समजाकंटक असणे असेल तर आम्ही समाजकंटक आहोत.
मात्र त्यांनी कोणतीही तोडफोड अथवा नासधूस केल्याचे नाकारले. पोलीस उपायुक्त (उत्तर) सागरसिंग कलसी म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या लिंक रोडवरील निवासस्थानासमोर सकाळी साडेअकराच्या सुमारास भाजयुमोच्या 150 ते 200 निदर्शकांनी धरणे धरले. एक वाजण्याच्या सुमारास काही निदर्शकांनी दोन बॅरिकेड तोडून मुख्यमंत्र्यांच्या घराच्या निवासस्थानाच्या बाहेर पोहोचले. त्यांनी तेथे गोंधळ घातला आणि घोषणाबाजी केली.
रंग ओतला, सीसीटीव्ही फोडले
निदर्शकांनी रंगाचा डब्यांचा छोटा डबा सोबत आणला होता. त्यांच्या दारावर रंग टाकला. कुंपण भींतीचे नुकसान करण्यात आले. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नुकसान केले आहे. पोलिसांनी तातडीने या गोष्टी तेथून काढून टाकल्या. सुमारे 70 जणांना घटनास्थळावर ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे, असे पोलीस उपायुक्त सागरसिंग कलसी यांनी सांगितले.