मुंबई – अंगडिया खंडणी प्रकरणात आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठी यांच्या अडचणी वाढत असल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी अटक टाळण्यासाठी त्यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. हा अर्ज न्यायालयाने आज फेटाळून लावल्याने त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.
अटकपूर्व जामीन अर्जात त्यांनी म्हटले आहे की, यापूर्वी एफआयआरमध्ये त्यांचे नाव नमूद करण्यात आले नव्हते. पोलीस स्टेशन स्तरावर अंगडियाकडून पैसे वसूल केले जात असल्याची माहितीही त्यांना नव्हती, असे नमूद करण्यात आले होते. दरम्यान, डिसेंबर 2021 मध्ये अंगडिया असोसिएशनने मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार केली होती की, त्रिपाठी त्यांच्याकडे पैशांची मागणी करत आहेत.
याच दरम्यान, डिसेंबर 2021 मध्ये अंगडिया असोसिएशनने मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार केली होती की, त्रिपाठी त्यांच्याकडे पैशांची मागणी करत आहेत. या गंभीर आरोपांनंतरच त्रिपाठी यांना राज्यातील गृहमंत्रालयाने निलंबित केले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिपाठी यांनी त्यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या प्राथमिक तपासादरम्यान एका पेन ड्राईव्हमधील एक ऑडिओ रेकॉर्डिंग तपास अधिकाऱ्यांना सुपूर्द केली होती. ज्यामध्ये अंगडिया व्यापारी त्यांना भेटण्यासाठी आले होते, त्यावेळी त्यांनी त्रिपाठी यांना आपल्याविरोधात कोणतीही कारवाई करू नये, म्हणून त्यांना लाच देण्याचे आमिष दाखवल्याचे बोलले जात आहे.