नगर – नगर शहरामध्ये विविध नागरी मुलभूत प्रश्नांपासून विविध विकासाचे प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन, स्थायी समिती सभापती पदाचा उपयोग केला जाईल. शहरामध्ये सध्या खड्ड्यांचा प्रश्न प्रलंबित आहे. तसेच शहर विकासाबरोबर केडगावमधील विविध प्रलंबित प्रश्न सोडविणार असल्याचे, प्रतिपादन स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर यांनी केले.
स्थायी समितीच्या सभापतीपदी कोतकर यांनी पदभार स्वीकारला. यावेळी विरोधीपक्ष नेता संपत बारस्कर, नगरसेवक कुमारसिंह वाकळे, अविनाश घुले, प्रकाश भागानगरे, सुनील त्रिंबके, राहुल कांबळे, बाळासाहेब पवार, गजेंद्र भांडवलकर, दादा दरेकर, अजय चितळे आदी उपस्थित होते.