मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना राजद्रोहाच्या आरोपाखाली झालेल्या अटकेनंतर त्यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला होता. आज नवनीत राणा आणि रवी राणा यांची यांची कारागृहातून सुटका झाली. राणा दाम्पत्य मागील 12 दिवसांपासून कारागृहात होतं. कारागृहातून सुटका होताच नवनीत राणा यांना प्रकृती खालावल्याने लिलावती रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं आहे.
Navneet Rana admitted at Lilawati Hospital. I am shocked about Ravi Rana & her experience of Jail
नवनीत राणा लीलावती रुग्णालयात. रवी आणि नवनीत राणा यांचे जेल मधले अनुभव ऐकून धक्का बसला@BJP4India @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis pic.twitter.com/cN42WWxULq
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) May 5, 2022
तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर रवी राणा आणि भाजप नेते किरीट सोमय्यांनी रूग्णालयात जाऊन नवनीत राणा यांची भेट घेतली. यावेळी पती रवी राणा यांना पाहताच नवनीत राणा आश्रू अनावर झाले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तर भाजप नेते किरीट सोमय्यांनी त्यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलतांना राणा यांचे तुरुंगातील अनुभव ऐकल्यानंतर मला इंग्रजांची आठवण झाल्याचे म्हटले आहे. तसेच रवी राणादेखील मानसिकदृष्ट्य खचले असल्याचे सोमय्यांनी यावेळी सांगितले.
ते पुढे म्हणाले, राणा दाम्पत्याचे जेलमधील अनुभव ऐकून ते इंग्रजांच्या जेलमध्ये होते की काय, असा प्रश्न पडतो. त्या खासदार आहेत, ते आमदार आहेत हे बाजूला ठेवा. पण उद्धव ठाकरे यांच्या माफिया सरकारने हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांवर ज्या पद्धतीने अन्याय केला, त्यांना राम आणि हनुमान कधीही माफ करणार नाही तसेच महाराष्ट्रातील जनताही माफ करणार नाही.’ असेही सोमय्या म्हणाले.