बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अली अब्बास जफर यांच्या दिग्दर्शनात होणारा कतरीना कैफचा “सुपरहीरो’ चित्रपट सध्या खूपच चर्चेत आहे. अली अब्बास जफर हे अनेक दिवसांपासून भारतात सुपरहीरो बेस्ड चित्रपट बनवू इच्छित होते. आता त्यांचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. हा एक बिग बजेट चित्रपट असणार आहे.
या चित्रपटाच्या शूटिंगच लवकरच श्रीगणेशा होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटात कतरीना कैफसोबत कोणत अभिनेता काम करणार याबाबत उत्सुकता होती. आता या चित्रपटात कोणताही मेल कलाकार नसल्याचे समोर आले आहे. यात कतरिना कैफच्या अपोझिट कोणताही अभिनेता कास्ट करण्यात येणार नाही.
अली अब्बास जफर म्हणाले, या चित्रपटात कतरिनासोबत कोणत्याही नायकाची आवश्यकता नाही. ती स्वतःच एक नायक आहे. हा चित्रपट खूपच भव्य-दिव्य असणार असून तो जरा हटके आहे. यात कतरीनाचा कोणताही रोमांटिक अँगल दाखविण्यात येणार नाही.
या चित्रपटाची शूटिंग पोलंड, जॉर्जिया, दुबई, अबुधाबी आणि उत्तराखंडमध्ये करण्यात येणार आहे. यातील दुबई आणि अबुधाबी येथील काही ठिकाणे शूटसाठी निश्चित करण्यात आली आहेत.