रॉनी स्क्रूवाला आणि सिद्धार्थ रॉय-कपूर द्वारा निर्मित “पिप्पा’ चित्रपटात पुन्हा एकदा भारतातील शौर्याची कथा मोठया पडद्यावर दाखविण्यात येणार आहे. ब्रिगेडियर बलराम सिंह मेहता यांच्या “द बर्निंग चाफीस’ या पुस्तकावर आधारीत या चित्रपटात अभिनेता ईशान खट्टर मुख्य भूमिका साकारणार आहे. या वॉर ड्रामा चित्रपटातील अन्य स्टारकास्टही निश्चित करण्यात आली आहे.
“सुपर-30′ फेम अभिनेता मृणाल ठाकुर, “एक्सट्रॅशन’ आणि “मिर्झापूर-2′ फेम प्रियांशु पैन्यूली हे या चित्रपटात ईशान खट्टरच्या भाउ-बहिणीची भूमिका साकारणार आहेत. तसेच सोनी राजदान या आईची भूमिकेत दिसणार आहे.
“पिप्पा’मध्ये ईशान खट्टर हा ब्रिगेडियर मेहताची भूमिका साकारत आहे. जे 1971च्या भारत-पाकिस्तान युद्ध काळात तैनात असलेल्या 45 व्या कॅव्हेलरी टॅंक स्क्वाड्रनच्या मोहिमेत आघाडीवर होते. या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू करण्यात येणार असून हा चित्रपट पुढील वर्षी अखेरीस प्रदर्शित होणार आहे.