Kashmir Tour – पृथ्वीवरील स्वर्ग (heaven) म्हटल्या जाणाऱ्या काश्मीरच्या (Kashmir journey) खोऱ्यांचे नयनरम्य नजारे आता रेल्वेतून पाहता येणार आहेत. शिमल्याप्रमाणेच उत्तर रेल्वे काश्मीरमध्ये (Kashmir journey) 19 ऑक्टोबर ते 18 जानेवारी या कालावधीत बडगाम आणि बनिहाल दरम्यान विस्टाडोम (पारदर्शक कोच) (Vistadome coaches) विशेष ट्रेन चालवणार आहे.
रेल्वे बोर्डाने जम्मू-काश्मीर प्रशासनाकडून सुरक्षेबाबत ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर उत्तर रेल्वेने ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रेनचे भाडे 180 ते 200 रुपये प्रति व्यक्ती असू शकते. विस्टाडोम (Vistadome coaches) एकूण 90 किमी अंतर कापून 12 स्थानके कव्हर करेल.
बडगामपासून सुरू होणारी ही ट्रेन श्रीनगर, पंपोर, काकपोर, अवंतीपोरा, पंजगाम, बिजबिहारा, अनंतनाग, सदुरा, काझीगुंड, हिलार शाहाबाद मार्गे बनिहालला पोहोचेल. ही ट्रेन आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. विस्टाडोम ट्रेनमधील डब्याचे छत काचेचे आहे.
त्याच्या खिडक्याही पूर्णपणे मोठ्या आणि पारदर्शक आहेत. त्यामुळे ट्रेनमधून आकाश आणि बाहेरचे दृश्य अधिक चांगले दिसते. विस्टाडोम कोचमध्ये (Vistadome coaches) एलईडी दिवे, फिरणारी सीट आणि जीपीएस आधारित माहिती प्रणाली असेल ज्यामुळे प्रवाशांना प्रवासाचा उत्तम अनुभव मिळेल.
काश्मीरमध्ये सध्या थंडीचा हंगाम आहे. अशा परिस्थितीत, विस्टाडोम ट्रेनमध्ये एसी आहे जो डब्यातील तापमान उबदार ठेवेल. 2017 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात जम्मू-काश्मीरसह अनेक राज्यांसाठी या विशेष ट्रेनची घोषणा करण्यात आली होती. यापूर्वी महाराष्ट्रातही मुंबई-पुणे मार्गावर विस्टाडोम कोच चालवण्यात आल्या होत्या.