मुंबई – भाजपचे दिवंगत नेते गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. पुण्यातील या जागेवरून महाविकास आघाडीत दावे प्रतिदावे केले जात आहेत. लवकरच लोकसभेची पोटनिवडणूक लागण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. पुण्याची जागा ही काँग्रेसकडे आहे, त्यामुळे ती आम्हीच लढणार, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. तर पुण्यात राष्ट्रवादीची ताकद जास्त असल्याने ही जागा राष्ट्रवादीला देण्यात यावी, अशी भूमिका अजित पवार यांनी घेतली आहे.
यावर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सूचक ट्वीट केले आहे. “कसेल त्याची जमीन या प्रमाणे… जो जिंकेल त्याची जागा. हे सूत्र ठरलं तर “कसबा” प्रमाणे पुणे “लोकसभा” पोट निवडणूक महाविकास आघाडीस सहज जिंकता येईल.जागांचा आकडा वाढविण्याचा हट्ट अनाठायी आहे.जिंकेल त्याची जागा याच सूत्राने महाराष्ट्र आणि देश जिंकता येईल. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येकाने थोडा थोडा त्याग करावाच लागेल! जय महाराष्ट्र!”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
https://t.co/unXxef5J6M
कसेल त्याचीजमिन या प्रमाणे..जो जिंकेल त्याची जागा.हे सूत्र ठरले तर “कसबा” प्रमाणे पुणे “लोकसभा” पोट निवडणुक महाविकास आघाडीस सहज जिंकता येईल.जागांचा आकडा वाढविण्याचा हट्ट अनाठायी आहे.जिंकेल त्याची जागा याच सूत्राने महाराष्ट्र आणि देश जिंकता येईल. संविधान…— Sanjay Raut (@rautsanjay61) May 29, 2023
काँग्रेस नेते देखील या जागेवर दावा सांगत असल्याने या जागेसाठी आणखी चुरस वाढली आहे. काँग्रेसचा हा पारंपारिक मतदारसंघ असल्याने आम्ही ही पोटनिवडणूक लढवणार असल्याचे काँग्रेसचे नेते मोहन जोशी यांनी सांगितले आहे.