पुणे – कसबा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज सकाळी आठ वाजता सुरु झाली. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे पहिल्या फेरीपासून आघाडीवर असल्याचे पाहायला मिळाले. तर कसब्यात अपक्ष म्हणून लढणारे बिग बॉस फेम अभिजित बिचुकले आणि आनंद दवे हे चुरस निर्माण करतील असं वाटलं होत मात्र धंगेकर विरुद्ध रासने अशी थेट लढत कसब्यात होताना पाहायला मिळत आहे.
दवे आणि बिचुकले या दोघांच्याही मतमोजणीची आकडेवारी पाहता पहिल्या काही फेऱ्यांमध्ये जनतेने अपक्षकांसह नोटाला प्राधान्य दिल्याचे पाहायला मिळाले. सकाळी दहा वाजेपर्यंत झालेल्या मतमोजी पर्यंत बिचुकले यांना ४ तर दवे यांना अवघी १२ मते पडल्याचे पाहायला मिळाले.
धंगेकर विरुद्ध रासने अशीच लढत
कसब्यातील जनतेने दिलेल्या निकालानुसार रवींद्र धंगेकर विरुद्ध हेमंत रासने अशीच सरळ फाईट पाहायला मिळत आहे. पहिल्या आठही फेऱ्यांमध्ये धंगेकर यांनी रासणेंविरोधात ३ हजाराहून अधिक लीड घेतल्याचे पाहायला मिळाले. आता ही मतांची मिळालेली आघाडी धंगेकर शेवटपर्यंत कायम ठेवतात का याकडे पुणेकरांचे लक्ष लागलं आहे.
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघासाठी 16 उमेदवार आहे. त्यानुसार पहिल्या फेरीचा निकाल सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास हाती आला. तर दुपारी निवडणुकीच्या निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. कसबा पोटनिवडणुकीसाठी रविवारी (दि.26) मतदान झाले. यामध्ये 50 टक्के इतके मतदान झाले होते.