पुणे – गेल्या महिन्याभरापासून प्रचंड चर्चेत राहिलेल्या कसबा आणि पिंपरी-चिंचवड या पुण्यातील दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा आज निकाल जाहीर होणार असून, संपूर्ण राज्याचं लक्ष या निकालाकडे लागले आहे. कसब्यातील दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त होत असताना भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे तर मविआकडुन रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली असून, आता कसब्यात किंगमेकर कोण ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान, आता निवडणुकांची मत मोजणी सुरु असून शहरातील कोरेगाव पार्क येथील वाहतूक वळविण्यात आली आहे. कोरेगाव पार्क येथील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामात ही मतमोजणी होणार आहे. आणि त्यामुळे सामान्य नागरिकांना याची कोणतेही अडचण होऊ नये यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे. मत मोजणी दरम्यान कोरेगाव पार्क येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.
जाणून घ्या, वाहतुकीतील महत्वाचे बदल.!
सेंट मीरा कॉलेज आणि अतूर पार्क सोसायटीकडून दक्षिण मुख्य मार्गाकडे येणाऱ्या वाहनांना लेन क्रमांक 1 पर्यंत प्रवेश दिला जाईल. येथे बॅरिकेडिंग करण्यात येणार असून, वाहने डावीकडे वळून इच्छित स्थळी जाऊ शकतात.
दक्षिण मेन रोड लेन क्र. 5,6,7 वरुन येणार्या वाहनांना फक्त लेन क्रमांक 4 पर्यंतच परवानगी असेल आणि वाहने इथून उजवीकडे वळू शकतील आणि त्यांच्या इच्छित स्थळी जाऊ शकतील.
सेंट मीरा कॉलेजसमोर, कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनसमोर आणि साऊथ मेन रोड लेन क्रमांक 5 समोर बॅरिकेडिंग करण्यात येणार आहे.
तसेच, उमेदवार आणि इतर नागरिकांनी सर्व प्रकारची वाहनेही संत गाडगे महाराज शाळेच्या आवारात उभी करावीत. असं देखील सांगण्यात आलं आहे.