Abhijit Bichukale | Lok Sabha Election 2024 : कला, साहित्य आणि राजकारण अशा प्रत्येक क्षेत्रात मुशाफिरी करणारे ‘अभिजित बिचुकले’ त्यांच्या अनोख्या स्टाईलमुळे कायम चर्चेत असतात. मात्र, आता पुन्हा एकदा बिग बॉस फेम बिचकुले चर्चेत आले आहेत. अभिजित बिचुकले यांनी लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. स्वतः त्यांनी याबद्दल सांगितलं आहे.
यापूर्वी राष्ट्रपतीपदाची निवडणूक असेल किंवा लोकसभा, विधानसभेची निवडणूक असेल यामध्येही त्यांनी आपलं नशीब आजमावलं होतं. मात्र, नेहमीच त्यांच्या वाटेला अपयश आलं आहे. ‘हरण्याची मला खंत नाही…’ असं म्हणत अभिजीत बिचुकले दरवेळेस नव्या दमाने निवडणुकीची तयारी करतात. यावेळेस त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली. । Abhijit Bichukale | Lok Sabha Election 2024
साताऱ्यातून अभिजीत बिचुकले लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. भाजपकडून उदयनराजे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून श्रीनिवास पाटील यांच्यात लोकसभेची रणधुमाळी उडणार या चर्चा तर आहेतच. पण यात आता आणखी एका नावाची भर पडली आहे. आणि ते नाव म्हणजे अभिजीत बिचुकले.
या विषयी बोलताना अभिजीत बिचुकले म्हणतात की, “देशाचं संविधान वाचवण्यासाठी मी लोकसभा निवडणूक लढवणार आहे’ असं बिचुकलेंनी म्हटलं आहे. कुठला पक्ष, कुठले नेते, कोण कुणाचे कार्यकर्ते, सतरंज्या उचलणारे आहेत याचं मला काही घेणंदेणं नाही. २००४, २००९, २०१४, २०१९ या चार निवडणुका मी लढवल्या आहेत. माझं अस्तित्व दाखवून देण्याचा प्रयत्न केला.
साताऱ्याच्या जनतेने २००९ मध्ये मला १२ हजारांहून जास्त मतदान केलं होतं. आताही तसंच मतदान होईल असं मला वाटतं. छत्रपती शिवरायांचे वारस म्हणून आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान टिकवायचं आहे. संपूर्ण समाज, विविध जाती धर्म यांना एकत्र घेऊन देशाला नवी दिशा आणि दशा द्यायची आहे.
येणाऱ्या लोकसभेला मी लोकसभेसाठी माझी उमेदवारी जाहीर करतो आहे. माझ्या संपूर्ण फॅन्सनी आणि सातारकरांनी माझा विचार करावा. मी सातारा हे नाव जगाच्या नकाशावर नेलं आहे. मला आता यावेळी दिल्लीत काम करण्याची संधी द्या..’ असं बिचुकलेंनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. । Abhijit Bichukale | Lok Sabha Election 2024