नवी दिल्ली : हिजाब वादावर कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे. न्यायालयाने मुलींची याचिका फेटाळून लावली आहे. न्यायालयाने म्हटले की, हिजाब हा धर्माचा अत्यावश्यक भाग नाही. विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजमध्ये गणवेश घालण्यास नकार देता येणार नाही. इस्लाममध्ये हिजाब घालणे अनिवार्य नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. यावर पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी न्यायालयाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
Karnataka HC’s decision to uphold the Hijab ban is deeply disappointing. On one hand we talk about empowering women yet we are denying them the right to a simple choice. Its isn’t just about religion but the freedom to choose.
— Mehbooba Mufti (@MehboobaMufti) March 15, 2022
याबाबत मेहबूबा मुफ्ती यांनी ट्विट केले की, ‘कर्नाटक उच्च न्यायालयाचा हिजाब बंदी कायम ठेवण्याचा निर्णय अत्यंत निराशाजनक आहे. एकीकडे आपण महिलांच्या सक्षमीकरणाविषयी बोलतो तर दुसरीकडे आपण त्यांचाहक्क हिरावून घेत आहोत. हा केवळ धर्माचा नाही, तर निवड स्वातंत्र्याचाही मुद्दा आहे.’
दरम्यान,हिजाब प्रकरणावरून देशभरात काही दिवसांपूर्वी एकच गोंधळ उडाला होता. याच हिजाबवर आज कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने मोठा निर्णय दिला आहे. हिजाब घालणे ही अत्यावश्यक धार्मिक प्रथा नाही, हिजाब हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही, असे कर्नाटक उच्च न्यायालयाने निकाल देताना म्हटले आहे.