मुंबई – बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच तिच्या ड्रेसिंग सेन्सने आणि स्टाइल स्टेटमेंटने चाहत्यांना वेड लावते. अभिनेत्री अलीकडेच ‘हॅलो हॉल ऑफ फेम अवॉर्ड्स 2022’ मध्ये अतिशय ग्लॅमरस आणि सिझलिंग लूकमध्ये पोहोचली. या इव्हेंटमध्ये उर्वशीला ज्याने कोणी पाहिलं ते तिच्याकडेच पाहत राहिले. या पुरस्कार सोहळ्याला अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी खास पेहरावामध्ये हजेरी लावली. पण या सगळ्यात उर्वशी रौतेलाने नेहमीप्रमाणे आपल्या जबरदस्त लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
View this post on Instagram
अभिनेत्रीने अवॉर्ड फंक्शनसाठी डीएल मायाने डिझाईन केलेला निळ्या रंगाचा डीप कट हाय स्लिट बॉडी फिटिंग लाँग गाऊन घातला होता, त्यात चमकणाऱ्या सोनेरी फुलांचे वर्क देखील होते. उर्वशीच्या या ग्लॅमरस गाऊनची किंमत 5.5 लाख रुपये आहे. ड्रेससोबतच अभिनेत्रीकडे 2 लाख रुपये किमतीचा ओशियानाचा स्टायलिश क्लचही होता. उर्वशीच्या बांगड्यांची किंमतही सुमारे दोन लाख रुपये आहे. एकूणच, अभिनेत्रीचा संपूर्ण पेहरावाची किंमत सुमारे 10 लाख रुपयांपर्यंत जाते.